भारत हा कृषिप्रधान देश असून, जगाला लागणा-या सर्व कृषिमालाचे उत्पादन भारतात होत असून १७० देशांना विविध प्रकारचा कृषिमाल निर्यात केला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने फळे, फुले व भाजीपाला या पिकांचा समावेश आहे. सन १९९५ साली प्रथमतः कृषिक्षेत्राचा जागतिक व्यापार करारामध्ये (डब्ल्यूट्टीओ) समावेश करण्यात आला आहे. यामुळे कृषिमाल निर्यातीकरिता जागतिक बाजारपेठ खुली होऊन विविध देशांसोबत एकाच वेळी करार झाल्यामुळे विविध देशांना कृषिमाल निर्यातींसाठीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर, सॅनिटरी व फायटोसॅनेटरी करारामुळे (sanitary & Phytosanitary Agreement) प्रत्येक सदस्यदेशाला त्याच्या ग्राहकांच्या आरोग्यासाठी व पर्यावरणाकरिता नियम करण्याचे अधिकारही प्राप्त झाले आहेत. त्यामुळे प्रगत व प्रगतिशील देश त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहेत.
खुल्या जागतिक व्यापार करारामुळे कृषेिमाल निर्यातींसाठी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या असल्या, तरी काही आव्हानेही निर्माण झाली आहेत. कृषेिमाल निर्यातींबरोबरच त्याची गुणवत्ता, कीड व रोगमुक्त उर्वरित अंशाची हमी, तसेच वेष्टने व नेिर्यात होणा-या मालाची थेंट शैतापर्यंतची ओळख इत्यार्दी बार्बींना जागतिक बाजारपेठेत विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. कृषिमालाची निर्यात करताना किंडी व रोगांचा एका देशातून दुस-या देशात प्रसार होऊ नये तसेच त्यावर नियत्रण ठेवण्यासाठी सर्वमान्य अशी काही विंशिष्ट पद्धत विकसित करण्यासाठी जागतिक व्यापार संघट्ने (FAO) अंतर्गत सन १९५१ साली आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार १९५१ (International Flant Protection C0nwension-1951) करण्यात आलेला आहे.
भारत या कराराचा सदस्यदेश असून करारानुसार कृषिमालाच्या आयात वनिर्यातीकरिता फायटोसनिटरी सर्टिफिकेट (Phytosanitary certificate) घेणे व कराराचे पालन करणे सर्व सदस्य देशांना बंधनकारक करण्यात आले आहे. या करारामध्ये १७२ देशांचा समावेश आहे. त्यात प्रगत, प्रगतिशील व अप्रगत देशांचा समावेश आहे. सन १९९५ पासू न देशात व राज्यात फळे, भाजीपाला व फुले या पिकांची व्यावसायेिक शेती करण्याकडे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्यादर्जाचे उत्पादन घेण्याकडे शेतक-यांचा कल वाढला आहे. त्यामुळेच फळे व भाजीपाला पिंकांखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
| क्षेत्र (हजार हेक्टरमध्ये ) | क्षेत्र (हजार हेक्टरमध्ये | उत्पादन (हजार मी. टनमध्ये ) | उत्पादन (हजार मी. टनमध्ये ) | महाराष्ट्राची टक्केवारी | महाराष्ट्राची टक्केवारी | ||
| अ.क्र. | पिके | भारत | महाराष्ट्र | भारत | महाराष्ट्र | क्षेत्र | उत्पादन |
| १ | फळे | ७२१६ | ७४१ | ८८९७७ | १२१६२ | १०. | १३.६ |
| २ | फुले | २५५ | ८ | २२९६ | ४४५ | 3.1० | १९.३ |
| ३ | भाजीपाला | ९३९६ | ५५७ | १६२८९६ | १४७९५ | ५.९ | ९. |
| एकूण | १६८६७ | १३०६ | २५४१६९ | २७४०२ | ७.७४ | १०.७८ |
एकूण देशाच्या तुलनेत फळे, भाजीपाला व फुले याअंतर्गत ७.७ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात असून देशाच्या १०.७ टक्के उत्पादन होते. महाराष्ट्र राज्य फळपिकांच्या उत्पादन व निर्यातीमध्ये अग्रेसर आहे.
भारतातील एकूण निर्यातीपैकी ९५ टक्के द्राक्ष , ७६ टक्के आंबा , ४९ टक्के कांदा , २७ टक्के इतर फळे व १८ टक्के इतर भाजीपाला महाराष्ट्रातून निर्यात होतो.
सध्या भारतातून प्रामुख्याने कृषिमालाची निर्यात ही प्रामुख्याने पुढील देशांना केली जाते.
● दक्षिण पुर्व एशिया : ३० टक्के (बांग्लादेश, श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स)
● मध्य पुर्व एशिया : २५ टक्के (यु.ए.ई., सौदी अरेबिया, ओमान, कुवेत)
- युरोप : १५ टक्के (नेदरलँड, यु.के. फ्रांस, जर्मनी)
- उत्तर अमेरिका : १० टक्के (अमेरिका, कॅनडा)
- आफ्रिका : १0 टक्के (दक्षिण आफ़िका, केनिया, नायजेरीया)
फळे, भाजीपाला व फुले या पिकांचे निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन करण्याकरिता पायाभूत सुविधा निर्माण करणे व शेतक-यांना मार्गदर्शन करुन जास्तीतजास्त कृषिमाल निर्यातीसाठी अपेडामार्फत एकूण २० राज्यात ६० पिकांकरिता निर्यात क्षेत्रांची (Agri Export zone) स्थापना करण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात खालीलप्रमाणे ८ फळपिकांचा समावेश आहे.
| अ.क्र. | पिकांचे नाव | सामाविष्ठ जिल्हे |
|---|---|---|
| १ | द्राक्ष व वाईन द्राक्ष | नाशिक , संगाळू,पुणे,सातारा,अहमदनगर ,सोलापूर |
| २ | आंबा(हापूस) | रत्नागिरी,सिंधुदुर्ग,रायगड ,ठाणे. |
| ३ | आंबा(केसर ) | औरंगाबाद , बीड,जालना,अहमदनगर ,लातूर |
| ४ | फुले | पुणे,नाशिक,कोल्हापूर ,सांगली |
| ५ | कांदा | नाशिक,अहमदनगर ,पुणे,सातारा,जळगाव,सोलापूर |
| ६ | डाळिंब | सोलापूर,सांगली,अहमदनगर ,पुणे,नाशिक,उस्मानाबाद,लातूर. |
| ७ | केळी | जळगाव,धुळे,नंदुरबार , बुलढाणा,परभणी,हिंगोली,नांदेड,वर्धा |
| ८ | संत्रा | नागपूर , अमरावती |
राज्यात महाराष्ट्र कृषि पणन मंडळामार्फत अपेडाच्या मदतीने फळे व भाजीपाला पिकाकरिता निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत त्यांचा तपशील .
आंबा (हापूस) – आंबा निर्यात सुविधा केंद्र, नाचणे, ता. जि. रत्नागिरी. – आंबा निर्यात सुविधा केंद्र, जमसंडे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग.
आंबा (केसर) – केसर आंबा निर्यात सुविधा केंद्र, जालना.
डाळींब – डाळींब निर्यात सुविधा केंद्र, जळूची, ता. बारामती. – डाळींब निर्यात सुविधा केंद्र, लातूर. केळी – केळी निर्यात सुविधा केंद्र, बसमत, जि. हिंगोली. – केळी निर्यात सुविधा केंद्र, सावदा, जि. जळगाव.
कांदा – कांदा निर्यात सुविधा केंद्र, कळवण, जि. नाशिक.
भाजीपाला – फळे व भाजीपाला निर्यात सुविधा केंद्र, इंदापूर, जि. पुणे.
संत्रा – संत्रा निर्यात सुविधा केंद्र, वरुड, जि. वर्धा.
वरील सुविधा व्यतिरीक्त खाजगी संस्थांमार्फत राज्यात नाशिक, पुणे, निर्यातीसाठी लागणा-या पॅकींग, ग्रेडींग व शीतगृहाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
कृषिमाल निर्यातीला प्रोत्साहन व चालना देण्यासाठी तसेच युरोपियन देशांना कोडनाशके उर्वरित अंशाची हमी देण्यासाठी राज्यात सन २00३-0४ पासून ग्रेपनेट या ऑनलाईन कार्यप्रणालीव्दारे निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी सुरू करण्यात आली. ग्रेपनेटचे यश लाक्षात घेऊन डाळिंबासाठी अनार्नेट, आंब्यासाठी मॅगोनेट व भाजीपाल्यासाठी व्हेजनेटची या ऑनलाईन प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
| अ.क्र. | पिक | ऑनलाईन प्रणाली | समाविष्ठ जिल्ह्ये | नोंदणीकृत बागांची संख्या |
|---|---|---|---|---|
| १ | द्राक्ष | ग्रेपनेट | नाशिक,जळगाव,पुणे,नगर,सोलापूर,सातारा,सांगली,औरंगाबाद,बीड,जालना,लातूर,परभणी,उस्मानाबाद , बुलढाणा | ३०५०० |
| २ | डाळिंब | अनारनेट | नाशिक,जळगाव,पुणे,नगर,सोलापूर,सातारा,सांगली,औरंगाबाद,बीड,जालना,लातूर,परभणी,उस्मानाबाद,बुलढाणा | २५०० |
| ३ | आंबा | मॅगोनेट | ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,नाशिक,जळगाव,पुणे,नगर,सोलापूर,सातारा,औरंगाबाद,बीड,जालना,लातूर,उस्मानाबाद | ३८०० |
| ४ | भाजीपाला (भेंडी) | व्हेजनेट | पुणे,पालघर,नाशिक,जळगाव,धुळे,पुणे,नगर,सोलापूर,सातारा,सांगली,बीड,जालना,परभणी,उस्मानाबाद | ५४४ |
नोंदणीकृत शेतकरयाना लेबल क्लेम अौषधाचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. यामुळे नोंदणीकृत बागेतील माल निर्यातीबरोबरच स्थानिक बाजारातील ग्राहकांनाही किडनाशके उर्वरित अंशमुक्त माल मिळण्यास मदतच होत आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून जागतिक व स्थानिक ग्राहकामध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे कृषिमालाच्या गुणवत्ते बरोबरच अन्नाच्या सुरक्षिततेबाबत ग्राहकांना हमी देणे आवश्यक झालेले आहे. येथून पुढे गुणवतेची हमी देण्याकरीता खालील बाबींवर विशेष भर द्यावा लागणार आहे.
- सेंद्रिय प्रमाणीकरण (Organic Certification).
- ग्लोबल गॅप प्रमाणिकरण (Global GAP Certification).
- हॅसॅप प्रमाणिकरण (HACCP Certification).
- पॅक हाउस प्रमाणीकरण (Pack House Accreditation).
- कीटकनाशक उर्वरित अंश तपासणी (Pesticide Residue Testing).
- पेस्ट रिस्क अनालिसिस (Pest Risk Analysis).
- उगम स्त्रोत (Source of Origin).
- एगमार्क प्रमाणिकरण
फुड सेफ्टी स्टॅन्डर्ड कायद्यांतर्गत स्थानिक बाजारपेठांकरिता कीटकनाशक उर्वरितअंश तपासणी (FSSA)ब्रॅडिंग(Branding).
निर्यातक्षम व किडनाशक उर्वरित अंशमुक्त उत्पादनासाठी
- पिकावरील किडी व रोगाचे नियंत्रण करण्याकरीता शिफारस केलेल्या औषधांचाच (कीटकनाशके/बुरशीनाशके) वापर करण्यात यावा. तसेच शिफारस न केलेल्या व वापरास बंदी घातलेली औषधे वापरू नयेत.
- युरोपियन कमिशन/कोडेक्स अलीयेनटीसीस कमिशन यांनी निर्धारित केलेल्या मर्यादेच्या आत उर्वरित अंशाचे प्रमाण असणे आवश्यक आहे.
- शिफारशीत औषधांची फवारणी प्रशिक्षित व्यक्तीव्दारे व योग्य त्या मात्रेत योग्य पध्दतीने करुन औषधांचा तपशील ठेवणे.
- फळाची काढणी व अंतिम फवारणीमध्ये किती अंतर ठेवले होते, याचा तपशील ठेवणे.
- फवारणीकरिता वापरण्यात आलेली फवारणी यंत्रे व औषधे तसेच कंटेनेरची स्वच्छता काळजीपुर्वक करणे आवश्यक आहे.
- कीड व रोगांच्या नियंत्रणाकरिता शिफारस केलेल्या औषधांची खरेदी ही अधिकृत कीटकनाशक विक्रेत्याकडून रितशीर पावती घेउन करावी.
- निर्यातक्षम बागेतील काढणीच्या एक महिना अगोदर रॅन्डम पध्दतीने नमूना घेवून त्यामधील उर्वरितअंश तपासणी करीता प्रयोगशाळेत पाठविताना नमुन्यासोबत फवारणी शेड्यूलची माहिती देण्यात यावी.
- पिकावरील किडी व रोगांचे प्रभावीपणे नियंत्रण करण्याकरिता एकात्मिक कोड व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करावा.
- उर्वरितअंश प्रयोगशाळेतील उर्वरितअंशाचे प्रमाण विहित मर्यादेच्या आत असेल तरच निर्यातीकरिता शिफारस करावी. युरोपियन देशांना निर्यातक्षम ताजी फळे व भाजीपाला निर्यात करताना त्यांना फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र आवश्यक असते, यासाठी केंद्रशासनाने फायटोसॅनिटरी ऑथॉरिटी प्राधिकृत केले आहेत.
जागतिक बाजारपेठेत ग्राहकाच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून जागरूकता निर्माण झाल्यामुळे तसेच सॅनिटरी व फायटोसॅनिटरी कराराची अंमलबजावणी प्रगत व प्रगतशिल देशांमार्फत सुरू झाली आहे. त्यामुळे आयातदारामार्फत व प्रमुख आयातदार देशामार्फत गुणवतेची व कोड रोग मुक्ततेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे स्ट्रेसेबिलीटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच प्रमुख आयातदारांचा कल हा ट्रेडर-निर्यातदार ऐवजी उत्पादक-निर्यातदाराकडून आयात करण्याची मागणी वाढत आहे.
शेतक-यांच्या गटाने एकत्रीत येउन शेतक-यांची निर्यातदार कंपनी स्थापन करून जागतिक बाजारपेठांबरोबरच स्थानिक बाजारपेठांतील ग्राहकाच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून उत्कृष्ट दर्जाच्या मालाचे उत्पादन करून त्यास आवश्यक असणारे प्रमाणिकरण करून निर्यात करण्यास मोठा वाव राहणार आहे. त्याचा शेतक-यांनी जास्तीतजास्त फायदा घेतला पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमार्फत फळे, फुले व भाजीपाला उत्पादक शेतक-यांना मदत करण्यात येत आहे याचाही शेतक-यांनी लाभ घ्यावा.
स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन