Crop County

चारा विकास योजना

चारा विकास योजना

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग एक योजना राबवीत आहे जिचे नाव आहे केंद्र पुरस्कृत चारा विकास योजना. चारा व अन्नपदार्थ (फीड) संवर्धनासाठी राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देणारी ही योजना आहे. सन 200506 पासून ही योजना, तिच्या खालील चार घटकांसह, राबवली जात आहे –

  1. चार्‍याचे ठोकळे (फॉडर ब्लॉक्स) बनवणारी यंत्रे उभारणे
  2. चराऊ कुरणे विकसित करणे, काही कुरणे राखीव ठेवणे
  3. चराऊ गवताच्या बियाण्याचे उत्पादन व वितरण
  4. जैवतंत्रज्ञानात्मक संशोधन प्रकल्प

२०१० पासून केंद्र पुरस्कृत चारा विकास योजनेत थोडेफार बदल केले गेले आहेत ज्यायोगे उपलब्ध असलेल्या चार्‍याचा जास्त कार्यक्षमतेने वापर करून घेता येईल. ह्यासाठी १४१.४० कोटी रूपयांची खर्चास मान्यता मिळाली आहे व ह्या योजनेमध्ये खालील नवीन घटक व तंत्रज्ञानाचा समावेश केला गेला आहे -चारा चाचणी करणार्‍या प्रयोगशाळांचे जाळे बळकट करणेतूस कापणी यंत्रांचा वापर करणे व वाढवणेमुरलेला चारा बनवणार्‍या यंत्रणेची स्थापनाअझोला प्रकारच्या जोपासना व उत्पादन यंत्रणेचे प्रात्यक्षिकबायपास प्रथिने बनवणार्‍या यंत्रणेची स्थापनाएरिया स्पेसिफिक मिनरल मिक्स्चर (एएसएमएम) / चार्‍याच्या गोळ्या / चारा उत्पादक यंत्रणांची स्थापना

शिवाय, चालू घटक योजनेवरील अनुदाना खेरीज, चार्‍याचे ठोकळे बनवण्याच्या यंत्रणेस दिले जाणारे अनुदान ५० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे ज्यायोगे ह्या योजनेतील सहभाग वाढेल. तसेच कुरण-विकास योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळण्यासाठीची जमिनीची मर्यादा, राखीव कुरणां सहित, ५-१० हेक्टर करण्यात आली आहे.

विविध घटक, कार्यपद्धती, यंत्रणेची किंमत व ११ व्या पंचवार्षिक योजनेतील बाकी असलेल्या २ वर्षां मध्ये गाठण्याच्या उद्दिष्टांचा तपशील ह्याप्रमाणे

परिवर्तित / नवीन घटकाचे नावलाभार्थीमदतीचा प्रकारप्रत्येकी किंमत (लाख रूपयांत)
चार्‍याचे ठोकळे बनवणार्‍या यंत्रणेची स्थापनासार्वजनिक / खाजगी उद्योजक,  सहकारी संस्था व स्व-मदत गटांसहित50:5085.00
चराऊ कुरणे विकसित करणे, राखीव कुरणां सहितशेतकरी, जंगले व पशुसंवर्धन विभाग. पंचायतीच्या जमिनींवर तसेच अन्य सामाईक स्रोतांच्या वापराने चराऊ कुरणे विकसित करण्यासाठी स्वयं सेवी संस्था व ग्राम पंचायतीच्या यंत्रणेस सामील करून घेतले जाईल100:000.70
चराऊ गवताच्या बियाण्याचे उत्पादन व वितरणशेतकरी. राज्य सरकार SIA/सहकारी दुग्धविकास संस्था/स्वयंसेवी संस्थांना प्रकल्पाच्या अंमल बजावणी मध्ये सामील करून घेऊ शकतात. राज्य शासनाद्वारे, दर क्विंटलला रु. ५००० प्रमाणे, एकूण ३७,००० क्विंटल चारा-बियाणांचे उत्पादन केले जाईल व ते शेतकर्‍यांना वाटले जाईल.75:250.05
चारा चाचणी करणार्‍या प्रयोगशाळांचे जाळे बळकट करणेसध्या अस्तित्वात असलेली  पशु वैद्यकीय कॉलेजे/ कृषी महाविद्यालयाच्या पशु-पोषण प्रयोगशाळा. चार्‍याच्या विश्लेषणासाठी लागणारी यंत्रणा / उपकरणांच्या खरेदीसाठी पैशाची तरतूद केली जाईल. मान्यताप्राप्त उपकरणांची यादी प्रसिद्ध केली जाईल.50:50200.00
हाताने चालवण्याच्या तूस-कापणी यंत्राचा परिचयशेतकरी व सहकारी दुग्धसंघ / एटीएमए/ कृषि विकास केंद्रांचे सदस्य75:250.05
विजेवर चालविण्याच्या तूस-कापणी यंत्राचा परिचयशेतकरी व सहकारी दुग्ध संघ / एटीएमए/ कृषि विकास केंद्रांचे सदस्य75:250.20
मुरलेला चारा बनवणार्‍या यंत्रणेची स्थापनाशेतकरी व सहकारी दुग्धसंघ / एटीएमए/ कृषि विकास केंद्रांचे सदस्य100:001.05
अझोला प्रकारच्या जोपासना व उत्पादन यंत्रणेचे प्रात्यक्षिकशेतकरी व सहकारी दुग्धसंघ / एटीएमए/ कृषि विकास केंद्रांचे सदस्य50:500.10
बायपास प्रथिने बनवणार्‍या यंत्रणेची स्थापनादुग्ध विकास संघ /  ज्यांच्या प्रकल्पास कोणत्याही व्यापारी बँकेची परवानगी आहे असे खाजगी क्षेत्रातील उद्योजक25:75145.00
एरिया स्पेसिफिक मिनरल मिक्स्चर (एएसएमएम) / चार्‍याच्या गोळ्या / चारा उत्पादक यंत्रणांची स्थापनासार्वजनिक / खाजगी उद्योजक,  सहकारी दुग्धसंस्था व ज्यांच्या प्रकल्पास कोणत्याही व्यापारी बँकेची परवानगी आहे असे स्व-मदत गट. फक्त यंत्रणा अथवा उपकरणांच्या खरेदीसाठी पैशाची तरतूद केली जाईल.25:75100.