Crop County

खाजण जागा वाटप योजना

महाराष्ट राज्यात निमखारेपाणी कोळंबी संवर्धन व्यवसायाची नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती असून समुद्र किनार्यालगत तसेच ७० लहान मोठया खाडयंलगत सुमारे ८०,००० हेक्टर खाजण क्षेत्र उपलब्ध आहे. कोळंबी संवर्धनाच्या दृष्टीने या क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आलेले असून एकूण १२,४४५ हेक्टर क्षेत्र कोळंबी संवर्धनाकरिता उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. या शासकीय खाजण जागा तसेच खाजगी खाजण जागा कोळंबी संवर्धनाखाली विकसित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत व केंद्र शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात.महाराष्ट राज्यात निमखारेपाणी कोळंबी संवर्धन व्यवसायाची नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती असून समुद्र किनार्यालगत तसेच ७० लहान मोठया खाडयंलगत सुमारे ८०,००० हेक्टर खाजण क्षेत्र उपलब्ध आहे. कोळंबी संवर्धनाच्या दृष्टीने या क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आलेले असून एकूण १२,४४५ हेक्टर क्षेत्र कोळंबी संवर्धनाकरिता उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. या शासकीय खाजण जागा तसेच खाजगी खाजण जागा कोळंबी संवर्धनाखाली विकसित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत व केंद्र शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात.

सुधारित धोरण शासन निर्णय कृषि व पदुम विभाग निर्णय निखायो १४९२/ प्र.क्र. १६३/ पदुम-१२, दिनांक २३ नोव्हेंबर, २००१ नुसार दिनांक २३.११.२००१ पासून अंमलात आणले. या निर्णयानुसार खालीलप्रमाणे लाभधारकांचे प्राथम्य क्रमवारी ठरविली आहे.

खाजण जमिन वाटपाबाबतचा नविन भाडेपट्टी दर

लाभधारकप्रिमियम (प्रति हेक्टरी रूपये)वार्षिक भाडेपट्टी दर (प्रतिहेक्टरी रूपये)
परंपरागत मच्छिव्यवसाय करणारे वैयक्तिक अर्जदार५,०००/-१,०००/-
मच्छिमार सहकारी संस्था१०,०००/-१,५००/-
कंपनी / पार्टनरशिप फर्मस व अन्य अर्जदार२५,०००/-२,०००/-

भाडेपट्टीच्या दरात दर ५ वर्षांनी वर विहित केलेल्या रकमेइतकी वाढ करण्यात येईल.

वैयक्तिक लाभार्थीच्या निवडीबाबत प्राथम्यक्रम

लाभार्थीच्या निवडीसाठी प्राथम्य क्रमवारीप्रवर्गामधील प्राथम्य क्रमवारी
परंपरागत मच्छिव्यवसाय करणारे वैयक्तिक अर्जदारमच्छिमार समाजातील अर्जदार
ज्या जिल्ह्यातील जमिनीचे वाटप करावयाच आहे त्या जिल्ह्यातील अर्जदार१) अनुसुचित जाती/जमाती/विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील अर्जदार
२) इतर मागासवर्गीय जातींमधील अर्जदार
३) माजी सैनिक
४) सुशिक्षित बेरोजगार अर्जदार
५) इतर अर्जदार

सुधारीत निर्णयानुसार जमिनीचे वाटप

अर्जदारहेक्टर
वैयक्तिक
सहकारी संस्था/कंपनी व उद्योजक३०
एकत्रित प्रकल्पाकरिता अतिरिक्त

जमिनीचे वाटपाचे प्रमाण

जमिनीचे वाटपाचे प्रमाण
२५ % गावाचे उपयोगासाठी.७५% मत्स्यसंवर्धनासाठी.
७५ % मत्स्यसंवर्धनासाठी.
६०% वैयक्तिक अर्जदार४०% कंपनी व उद्योजक
६० % वैयक्तिक अर्जदार
८० % स्थानिक मत्स्यसंवर्धक.२० % बाहेरील मत्स्यसंवर्धक.

जमिन वाटपाचे अधिकार

शासनाच्या जा.क्र.जमीन १०/२००२/प्र.क्र.३१०/ग-१, दिनांक ११.३.२००२ च्या निर्णयान्वये शासकीय खाजण जागा वाटपाचे अधिकार खालील सक्षम अधिकार्यांना देण्यात आले आहेत.

सक्षम अधिकारीवारस मंजूरी कमाल क्षेत्र हेक्टर
जिल्हाधिकारी२०
विभागीय आयुक्त२० – ५०
शासन५० पेक्षा जास्त

संदर्भ : मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन